आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सास्तुर येथे कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम

लोहारा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि. १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यभर संयुक्त सक्रीय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेबद्दल जनजागृती व्हावी यासाठी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे सोमवारी (दि.१२) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी उस्मानाबादच्या वतीने सहाय्यक संचालक कुष्ठरोग तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांच्या मार्गदर्शनानुसार कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियानाची तयारी करण्यात आली आहे.

क्षय व कुष्ठरोगाबद्दल गावकरी व संशयीत रुग्णामध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व वैद्यकीय अधिकारी मृणालिनी देसाई यांनी हिरवी झंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. अज्ञानामुळे किंवा भीती पोटी ग्रामीण भागातील लोक क्षयरोग व कुष्ठरोगा सारखा आजार लपवतात व तो लपवल्यामुळे क्षयरोग तसेच कुष्ठरोगाचा संसर्ग होऊन रुग्णवाढ होते. हे टाळण्यासाठी लगेच आजाराचे निदान झाले तर क्षयरोग व कुष्ठरोग औषध उपचाराने १०० टक्के बरे होतात. तसेच त्यासाठी शासकीय आर्थिक लाभ देखील मिळतो असे प्रतिपादन जोशी यांनी यावेळी बोलताना केले.

बातम्या आणखी आहेत...