आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:रासेयोच्या स्वयंसेवकांना श्रमसंस्काराचे धडे‎

चोपडा‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगिनी मंडळ संचालित समाजकार्य‎ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागाचे विशेष श्रम‎ संस्कार शिबिर १८ ते २४ जानेवारी‎ या कालावधीत बोरअजंटी‎ आयोजित केले होते. या शिबिराचा‎ नुकताच समारोप करण्यात आला.‎ या शिबिराचे समन्वयक प्रा.डॉ.‎ राहुल निकम व महिला कार्यक्रम‎ अधिकारी प्रा.डॉ. संबोधी देशपांडे हे‎ होते. समारोप कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ईश्वर‎ सौंदाणकर तर प्रमुख अतिथी म्हणून‎ रासेयोचे विभागीय समन्वयक‎ प्रा.डॉ. संजय शिंगाने, ललित कला‎ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र‎ महाजन, भगिनी मंडळ माध्यमिक‎ शाळेचे मुख्याध्यापक सुनील‎ चौधरी, आश्रम शाळेचे‎ मुख्याध्यापक किरण चौधरी,‎ मुख्याध्यापक डी. पी. पावरा,‎ बोराअजंटीचे सरपंच धर्मसिंग‎ बारेला, पोलिस पाटील प्रवीण‎ सुलताने, नेहा भादले, अजय बारी‎ उपस्थित होते. या वेळी भगिनी‎ मंडळ संस्थेच्या आद्य संचालिका‎ डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या‎ प्रतिमेला माल्यार्पण करून‎ कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ.‎ राहुल निकम यांनी प्रास्ताविकात‎ शिबिरादरम्यान राबवलेले विविध‎ कार्यक्रम व उपक्रमांचा आढावा‎ मांडला.

सुनील चौधरी यांनी मनाेगत‎ व्यक्त केले. डॉ. संजय शिंगाने यांनी‎ शिबिरादरम्यान केलेल्या उपक्रमांचा‎ आढावा घेतला. प्राचार्य डॉ. ईश्वर‎ सौंदाणकर यांनी स्वयंसेवकांच्या‎ कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिबिरास अध्यक्षा पूनम गुजराथी,‎ उपाध्यक्षा छाया गुजराथी,‎ सहसचिव अश्विनी गुजराथी, सर्व‎ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसह‎ संचालक धनंजय भादले, जितेंद्र‎ भादले, दीपक धनगर व ग्रामस्थांचे‎ सहकार्य लाभले. या वेळी ५०‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिबिरार्थी उपस्थित होते.‎ सूत्रसंचालन प्रतीक्षा झुरकाळे हिने‎ तर प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी‎ आभार मानले. शिबिरात‎ स्वयंसेवकांना श्रमसंस्कारांचे महत्व‎ सांगण्यात आले. सामाजिक‎ विषयांवर प्रबोधन केले.‎

बातम्या आणखी आहेत...