आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट:खव्याला बाजारपेठ व भांडवल मिळवून देऊ ; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

पाथरूडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देण्यासाठी पाथरूड येथे आले असता त्यांनी खवा व पेढा भट्टीला भेट दिली होती. हा व्यवसाय वाढीसाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्या अनुषंगाने खवा पेढा व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. खवा पेढा उद्योजकांना आपल्या मालाची क्वालिटी,बाजारपेठ,व त्यासाठी लागणारे भांडवल यासाठी विशेष प्रोजेक्ट मधून निधीची तरतूद करून सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायतने ठराव देण्याच्या सूचना केल्या. मराठवाडा पॅकेज अंतर्गत ग्रामीण भागामध्ये दुग्ध वाढीसाठी एक हजार गाई व म्हशींसाठी अर्ज आल्यानंतर वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच बाहेर राज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त खवा पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिले.

दोन तास झालेल्या बैठकीमध्ये खाऊ पेढे संदर्भात असलेल्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादकांसोबत सविस्तर चर्चा केली बैठकीसाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता, प्रांजल शिंदे ,प्रकल्प संचालक सचिन ससाणे, एन. पी. जवळेकर, डॉक्टर पसराटे, पाथरुडचे उपसरपंच प्राध्यापक तानाजी बोराडे, श्रीराम वनवे, संजय बोराडे, महादेव वडेकर, भरत बोराडे, उमाचीवाडी उपसरपंच प्रदीप शेळके, डॉक्टर भरत दळवी, शुभम तिकटे, तात्यासाहेब बोराडे ,राजेंद्र तिकटे, दादासाहेब शेळके, सोमनाथ गावडे, भाऊसाहेब बोराडे ,तुषार गव्हाणे, जयराम गव्हाणे, बबन माळी, चिंतन काटे, प्रभू माने, समाधान दळवे, श्रीकांत हाके उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...