आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खो-खोचे उद्घाटन:जागतिक खो-खो स्पर्धा घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ : अजित पवार

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक खो-खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.उस्मानाबाद येथे रविवारी ५५ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी ३२ देश सहभागी होणाऱ्या जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती केली, त्यास उत्तर देताना पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. जिल्ह्यातील खो-खो पटूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

त्यांना घडवणाऱ्या डॉ. चंद्रजीत जाधव यांनाही शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार येथील सारिका काळे यांना मिळाला.यावेळी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मधुकर चव्हाण, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, महेश गादेकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...