आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा, सार्वजनिक स्वच्छतागृह व महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही. रोडवर मोकाट जनावरांची गर्दी होते, आदी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी अॅड. शीतल फाउंडेशनने तीन महिन्यांपूर्वी पालिकेला निवेदन दिले होते. परंतु त्यातील काही समस्या तात्पुरत्या सोडवण्यात आल्या आहेत, अनेक प्रश्नी पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही.
त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र देण्यात आले. पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने बाहेरगावातून शहरात खरेदी, विविध कार्यालये व न्यायालयात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.
पालिकेने यापूर्वी सांगितले होते की, लातूर येथील एका कंपनीला कंत्राट दिले असून लवकरच सर्वेक्षण करून स्वच्छतागृह उभारणी सुरू करणार. परंतु अद्याप स्वच्छतागृहांचे काम सुरू झाले नाही. तसेच हमीद नगर, काळे प्लॉट व गणू डॉक्टर प्लॉट परिसरात नियमित व मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागातील बहुतांश नागरिक हे काबाडकष्ट करणारे आहेत. नळाला पाणी आले नाही तर हातपंप, बोअरवरून रात्री-बेरात्री पाणी भरण्याचा अतिरिक्त ताण येथील नागरिकांवर पडत आहे. स्मरण पत्रावर ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चानाताई जाधव, लईखाँ औटी, प्रदीप चौधरी, व्यंकटराव भालेराव, राजू बटगिरे, अखिल शेख, मुसा उस्ताद, फारुख शेख, एस. बी. गायकवाड, फारुख शेख, चिदानंद स्वामी, अशोक कांबळे, रवी सांगवे, माधव माने आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.