आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने पत्नीचा खून करणाऱ्या एपीआयला जन्मठेप

धाराशिव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून पत्नीचा खून करणाऱ्या येरमाळा (ता. कळंब) येथील पोलिस ठाण्याचा तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण याला मंगळवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सहायक सरकारी अभियोक्ता रश्मी चंद्रशेखर नरवाडकर यांनी सांगितले की, येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण याला धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड तसेच आरोपीने पुरावा नष्ट केल्यामुळे ७ वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पत्नी मोनाली यांचा आपल्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने खून केल्याचा आरोप चव्हाणवर होता. याप्रकरणी मुलीचे वडील शशांक पवार यांच्या तक्रारीवरून चव्हाण याच्यासह आई विमल चव्हाण, वडील बापू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.