आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबीयांना तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्यमान भारत कार्ड जिल्ह्यात केवळ ७५ हजार ४३७ जणांनी काढले होते. गेल्या १५ दिवसांत कार्ड वाढवण्यासाठी अॅक्शन प्लॅन जिल्हा परिषदेने तयार केला होता. मात्र, ३१३ चीच यामध्ये वाढ झाली आहे. प्रत्यक्षात याचे लाभार्थी जिल्ह्यात चार लाख ३२ हजार २१५ आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार जिल्ह्यातील प्रतिथयश खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, लाभार्थींकडून या योजनेसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. लाभार्थींना अनेक दिवसांपासून शासकीय यंत्रणांकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्ड घेण्याबाबत आवाहन करण्यात येत होते. परंतु, कार्ड काढून घेण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळाला नाही. एक लाख ३२ हजार ८४ कुटुंबाची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. कुटुंबातील चार लाख ३२ हजार २१५ सदस्यांना यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयात मोफत उपचार
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात म्हणावे तसे उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात तर गुंतागुंतीच्या वेळी सोलापूरला रेफर केले जाते. यामुळे रुग्ण शक्यतो खासगी रुग्णालयांकडे वळतात. त्यांना मोठा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्जही त्यांना काढावा लागते. यामुळे आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक आहे.
महत्त्वाची योजना
आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. ही योजना महत्वाची आहे. आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन कार्ड काढून घ्यावेत. काही अडचण आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. शिवकुमार हालकुडे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.