आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक:मौलाली बाबांच्या दर्ग्यावर 50 हजार बल्बची रोषणाई; आज कुस्त्यांची दंगल

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडा येथील मौलाली बाबांचा उरूस (यात्रा) उत्सव सोमवारपासून झाली असून हा उत्सव आठ दिवस चालणार आहे. मौलाली बाबांच्या दर्ग्यावर ५० हजार बल्बची रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेत बीड, मुंबईसह इतर जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होत आहेत.

मौलाली बाबा दर्गा अन् श्रद्धा
कोणतही महत्त्वाचे काम करताना कडा येथील मौलाली बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय केले जात नाही हे विशेष. स्व. गोपीनाथराव मुंडे आणि बाबांचा दर्गा हे एक प्रकारचे अतूट नाते होते. मुंडे यांनी प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ दर्ग्यावर चादर अर्पण करूनच केला होता.

खेळण्यांची दुकाने सजली
यात्रेत मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आले आहेत. त्यात शंभरफुटी रहाटपाळणा, मौत का कुआ, सर्कस, पन्नालाल, भैरव जादूगार मनोरंजन करत आहेत. तसेच खेळण्यांची दुकाने, मिठाईचे स्टॉल लागले. यात्रेत मंगळवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...