आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त:पाटील तांड्यावरील दारूची भट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्गच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गावठी दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटील तांड्यातील गावठी दारूचा हातभट्टी अड्डा स्थानिक गुन्हे शाखा व दंगल नियंत्रण पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. पथकाने कारवाई करीत ५३५ लिटर हातभट्टीची दारूसह ९२०० लिटर रसायन जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ६ वाजता करण्यात आली असून सुमारे पाच लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या पथकाला गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर दोन्ही पथकांनी पाटील तांडा येथे आचानक धाड टाकली. विलास बाबू पवार (३८), चावलाबई धनु पवार (६०), लखन हिरा चव्हाण (२५, सर्व रा. पाटील तांडा) हे येथे गावठी दारूचा अड्डा चालवत होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ, यांच्यासह अमोल चव्हाण, नितीन जाधवर, शौकत पठाण, मुजाहिद पठाण, जावेद काझी, हुसेन सय्यद, अशोक ढगारे, बलदेव ठाकूर, योगेश कोळी, रवी आरसेवाड, सुनील जानराव, बंडू निंबाळकर, वैशाली सोनवणे, रंजना होळकर आदींनी ही कारवाई केली. पाटील तांड्यातील गावठी हातभट्टी दारू बनविणाऱ्यांचा इतिहास पाहता त्या ठिकाणी सहजासहजी कोणी धाड मारण्याची हिंमत करत नाही.

बातम्या आणखी आहेत...