आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कारसह दारू जप्त, साडेसहा‎ लाखांचा माल हस्तगत‎

तेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे‎ अवैध विक्रीसाठी दारू येत‎ असल्याची गुप्त माहिती‎ पोलिसांना मिळाली होती.‎ त्यावरून ढोकी पोलिसांनी तेर‎ येथे सापळा रचून कारवाई केली.‎ यात एका चार चाकी वाहनासह‎ दारूचा साठा जप्त करुन‎ साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल‎ जप्त केला.‎ या प्रकरणी मिळालेल्या‎ माहितीनुसार ३१ जानेवारी रोजी‎ तेर मध्ये अवैध विक्रीसाठी दारु‎ येणार असल्याची माहिती ढोकी‎ पोलिसांना मिळाली होती.‎ त्यानुसार त्यांनी एक टाटा सुमो व‎ देशी विदेशी प्रकारच्या दारुच्या‎ ४७२ बाटल्या जप्त केल्या.

त्यांची‎ अंदाजे किंमत ७१ हजार ८१०‎ रुपये असून गुन्ह्यात वापरलेल्या‎ वाहन असा एकूण सहा लाख ७१‎ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त‎ केला. त्याच बरोबर या गुन्ह्यातील‎ तेर येथील आरोपी रवींद्र जालिंदर‎ राऊत याला ढोकी पोलिसांनी‎ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला‎ आहे. पोलिस ठाण्याचे फौजदार‎ भागवत गाडे, कपिल बुध्देवार,‎ प्रदीप मुरळीकर, संजय‎ भंडारकवठे, गोविंद खोकले‎ आदींचा या पथकात समावेश‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...