आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:कडदोरा गावातील शेतकऱ्यांना‎ उपजीविका जागरूकता प्रशिक्षण

उमरगा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात कडदोरा येथे उमेद‎ अभियान संपदा ट्रस्ट व वॉटर‎ शेड संस्थेच्या संयुक्त‎ विद्यमाने ग्रामीण समुदाय‎ समग्र विकास कार्यक्रम‎ अंतर्गत बुधवारी (दि ०४)‎ उपजीविका जागरुकता‎ प्रशिक्षण कार्यक्रम‎ ग्रामपंचायत कार्यालयात‎ शेतकरी व महिला‎ शेतकऱ्यांचे एक दिवशीय‎ प्रशिक्षण घेण्यात आले.‎ सरपंच सुनंदाताई रणखांब‎ अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी‎ उमेद कृषी व्यवस्थापक‎ किशोर औरादे, संपदा ट्रस्ट‎ प्रोजेक्ट ऑफिसर मनोज‎ पाटील,वॉटरशेड संस्था‎ टेक्निशियन मंगेश मांडगे,‎ ग्रामसेवक अलिफ शेख आदी‎ उपस्थित होते.

उमेद कृषी‎ व्यवस्थापक किशोर औरादे‎ यांनी शेतकरी व शेतकरी‎ महिलांनी शेतीला जोडधंदा‎ म्हणून स्वतःची उपजीविका‎ तयार करण्यासाठी कृषी व‎ पशुसंवर्धनच्या विविध‎ योजनेचा लाभ घ्यावा. यामध्ये‎ तुती लागवड, रेशीम उद्योग,‎ फळबाग लागवड, पशुसंवर्धन‎ च्या गाई, म्हशी,‎ कुक्कुटपालन, शेळी पालन‎ आदी योजनेचा लाभ घ्यावा‎ असे आवाहन केले.‎ पाटील यांनी ग्रामीण समुदाय‎ समग्र विकास कार्यक्रमांतर्गत‎ उपजीविका जागृती प्रशिक्षण‎ कार्यक्रम वेळोवेळी राबविले‎ जातील याचा लाभ‎ शेतकऱ्यांनी घेवून स्वतःची‎ उपजीविका तयार करावी‎ असे मत व्यक्त केले.‎

मांडगे यांनी शेतीतील खर्च‎ कमी करण्यासाठी सेंद्रिय‎ शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे‎ कृषी व कृषी संलग्न उद्योग‎ व्यवसायाची व्याप्ती,‎ मूल्यवर्धन साखळीमध्ये‎ महिलांचा सहभाग‎ वाढविण्यासाठी उत्पादक गट,‎ महिला शेतकरी उत्पादक‎ कंपनी, सेंद्रिय शेती चालना‎ देवून ग्रामीण कुटुंबांच्या‎ उपजिविका बळकट करावे,‎ असे सांगितले. गावस्तरावर‎ ग्राम संघ व प्रभाग संघ स्थापन‎ करण्याची सूचनाही त्यांनी‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...