आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:संत सहवासात राहिल्याने जीवनमान सुधारते; जगण्यासाठीचा मार्ग सापडतो, दौलतबाबा महाराज यांचे निरूपण

पिंपळगाव रेणुकाई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताच्या सहवासात व संगतीत राहिल्याने जीवनमान सुधारते व जगण्यासाठीचा मार्ग सापडतो. जीवनाच्या अवघड रस्त्यानी वाटचाल करत असताना हा रस्ता सोपा करण्यासाठी संताची साथ आवश्यक असल्याचे दौलतबाबा महाराज यांनी सांगितले.

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांवगी येथील सुरू असलेल्या एकादश कुंडात्मक यज्ञ व संगीतमय शिवपुराण कथा सोहळयात काल्याच्या किर्तनात दौलतबाबांनी निरूपण केले. यावेळी आमदार संतोष दानवे, भाजप तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख, उपसभापती सुखलाल बोडके यांची उपस्थिती होती. दौलतबाबा म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. जीवन एक पाण्याचा बुडबुडा आहे. कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना आपले कर्म व नियत साफ ठेवत आनंदाने जीवन जगून इतरांनादेखील आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहीजे. कारण चांगले कर्म हे तुकोबारायांच्या गाथेप्रमाणे असतात. कुणी कितीही बुडविण्याचे प्रयत्न केले तरीही ते तरते. जगामध्ये साधुसंताचेही विशेष महत्त्व आहे. संत देखील चंदना पेक्षा श्रेष्ठ असतात. धरती, आकाश, सूर्य, चंद्र, वृक्ष, नदी, समुद्र हे परोपकारासाठी असून याच प्रमाणे मानव देह प्राप्त झालेल्या मानवाने सुद्धा परोपकारी वृत्ती ठेवल्यास जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. सद्यस्थितीत माणसाची नितीमत्ता खराब झाली असल्याने दरवर्षी निसर्ग मनुष्यावर कोपू लागला आहे.

याचे परिणाम माणसाला भोगावे लागत आहे. यासाठी माणसाने देखील शाश्वत जीवन जगण्यासाठी निसर्गावर प्रेम करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकांने वृक्ष संगोपण करुन पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही. जो दुसऱ्याचे वाईट चिंतत असतो त्याने जीवनात आपले कधीही चांगले होईल याची अपेक्षा ठेवू नये. तसेच दुसऱ्याचे चांगले झाले पाहिजे अशी भावना ठेवणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर कशाचीच कमी पडु देत नसल्याचे देखील दौलत बाबा महाराजांनी सांगितले. यावेळी दत्तु अण्णा सपकाळ, भगवान महाराज गाडेकर, चिल्या बाळ महाराज, योगेश महाराज खरात, रवी महाराज, सुपर महाराज, प्रभाकर महाराज यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

आजच्या तरुण पिढीने संत संगतीत येऊन जीवनाचे कल्याण करून घ्यावे
या गावात आपण राजकारणी म्हणून नाही तर एक भाविक म्हणून साधुसंताच्या पाताळेश्वराच्या दर्शनासाठी आलो आहे. एवढ्या लहानशा गावात डोळे दीपवून टाकणारा सोहळा पाहून मन भारावून गेले आहे. आजच्या तरुण पिढीने व्यसनाधीनतेकडे न वळता संत संगतीत येऊन जीवनाचे कल्याण करुन घेण्याचे आवाहन आमदार संतोष दानवे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...