आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उड्डाण पुलाच्या अर्धवट कामामुळे परिसर धोकादायक; काक्रंबा येथे गलथानपणाचा गेला आणखी एक बळी

काक्रंबा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर ते औसा या ५५ कि.मी.चे सिमेट रस्ता महामार्गाचे काम गेली चार वर्षे झाले चौपदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र काक्रंबा येथे करण्यात आलेल्या उड्डाणपुलासह बायपास चौकाचे काम रखडल्याने एकेरी मार्गाने वाहतुक सुरू आहे. अर्धवट उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने बायपास चौकात दर दिवसाला अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान सोमवारी रात्री झालेल्या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला. यावर कायमच्या उपाय योजना न करता केवळ तात्पुरत्या स्वरुपात गतिरोधक केले जात असल्याने अपघाताची मालिका सुरूच राहिली असून चौकात उड्डाणपूल नसल्यामुळे या ठिकाणी चारी बाजूनी येणारी वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडून अनेकांना ६६ जणांना जीव गमवावा लागला आहेत. तुळजापूर-नागपूर-रत्नागिरी या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडे जाऊन रस्ता उखडू लागला आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्याऐवजी टोलचे पूर्ण काम करून दि २० डिसेंबर २०१९ पासुन टोल वसुली सुरूही करण्यात आली. रखडलेल्या रस्ता प्रश्नी दोन वर्षापूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रशासनाने त्यांची आश्वासन देऊन बोळवण केल्याने संताप व्यक्त होत आहे.

ना सुचना फलक,ना गतीरोधक तुळजापूर-नागपूर- रत्नागिरी या राज्य महामार्गावरील काक्रंबा येथील रखडलेल्या उड्डाणपुलासह बायपास चौकात महामार्गावर ठिकाणी व गावानजीक सबंधित ठेकेदाराने कुठल्याही प्रकारे विजेची कामे न केल्याने या परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही बाजूनी रस्ता खोदला आहे. मुरूमाचे ढिगारे टाकले आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी सिमेंट काँक्रीटच्या स्लेटा टाकलेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी अरुंद रस्ताने वाहतुकीची कोंडी होते.

शिवसेना स्टाइल आंदोलन
काक्रंबा येथे रखडलेला अर्धवट उडाणपुल व बायपास चौकात ठेकेदाराने चुकीचे कामे केल्याने सातत्याने घडणाऱ्या अपघातामुळे अनेकांना नाहक जीव गमवावे लागत असल्याने खा.ओमराजे यांनी सबंधित कंपनीचे अधिकारी व प्रशासना बरोबर वारंवार बैठका घेतल्या. पण काही उपयोग झाला नाही. यापुढे शिवसेना स्टाइलने आंदोलन करून टोलवसुली बंद करू .
चेतन बंडगर, शिवसेना सोशल मिडिया, तालुका प्रमुख

बातम्या आणखी आहेत...