आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत बिनविरोध:लोहारा तालुक्यात 71.18 टक्के मतदान

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.१८) मतदान पार पडले. या बारा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान झाले. लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु वडगाव गांजा ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८ ) मतदान घेण्यात आले.

या १२ ग्रामपंचायती मधील ३५७४८ पैकी एकूण २५४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सर्व ४७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झालेली दिसून आली. त्यानंतर मतदारांचा ओघ कमी झाला. परंतु दुपारी तीनच्या नंतर मतदार मतदानासाठी येत होते.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षांनी मतदान यंत्र सील करून तहसील कार्यालयात घेऊन आले. रात्री ९ वाजेपर्यंत मतदान यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या बारा ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांचे भवितव्य बंद झाले आहेत. मंगळवारी (दि. २०) लोहारा तहसिल कार्यालयात मतमोजणी होईल.

बातम्या आणखी आहेत...