आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोक अदालत हे आपले वाद तडजोडीने मिटवण्याचे प्रभावी माध्यम असून सर्वोच्च न्यायालयाने जनसामान्यांसाठी केलेला अतिशय लाभदाय उपक्रम आहे. आपण जे न्यायालयात कागदावरील वाद बघतो आणि कागदवर जे निर्णय घेतो त्यापेक्षा आपापसात वाद तडजोडीने काढून आपले निर्णय आपण स्वत: घ्यावे आणि वाटाघाटीतून मार्ग काढून एक पाऊल पुढे-एक पाऊल मागे असा मोठेपणा सगळ्यांनी घ्यावा.
खटले चालू ठेवून आपला खर्च, वेळ आणि शक्ती वाया घालवू नये.त्यापेक्षा लोक अदालतीच्या माध्यमातून सामंज्यस्याने आपले वाद मिटवावेत असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू एस.शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या राष्ट्रीय लोक अदालत या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश शेंडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर.एस.गुप्ता, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी घेटे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य एम. एस. पाटील, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.