आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्ध व्यवसाय:शेळी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठी लूट

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात दि.२८ व २९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व आयएसओ प्रमाणित आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्र आयोजित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय योजना व कर्जाला आवश्यक असणारे आयएसओ प्रमाणित प्रमाणपत्र व नमूना प्रोजेक्ट मिळेल असे आमिषही दाखवण्यात आले होते. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणारे युवक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक प्रशिक्षणस्थळी आले होते.

प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्राव्दारे कर्ज मिळेल या आशेने युवक आले होते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर प्रकल्प अधिकारी निलेश मोटे यांनी प्रशिक्षण व प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून द्या व त्याबरोबर दोन हजार शंभर रुपयांची मागणी केली. यावेळी बहुतांश बेरोजगार युवकांनी, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगताच प्रकल्प अधिकाऱ्यांनी बेरोजगार युवकांना प्रशिक्षण स्थळावर प्रवेश नाकारला.

यामुळे उत्साहाने आलेले बेरोजगार युवक प्रशिक्षण न घेताच हिरमोड होऊन माघारी फिरले. प्रशिक्षण देतो म्हणून बेरोजगार युवकांची हजारो रुपये घेऊन फसवणूक होत आहे. तरीही याकडे कोणीही लक्ष देत नाही. यासर्व प्रकाराची चौकशी करून संबधीतावर कडक कारवाई करण्याची मागणी संबंधीत बेरोजगार तरुणांमधून होत आहे. या प्रकाराबाबत प्रकल्प अधिकारी निलेश मोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आता मी सध्या लातूर येथे आहे. तुम्हाला प्रशिक्षण व प्रमाणपत्रासाठी दोन २ हजार १५० रुपये व कागदपत्र पाठवा. तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.

प्रमाणपत्रासाठी ५०० रुपये
माझ्याकडे दोन दुधाळ गाई असल्याने प्रशिक्षण व प्रमाणपत्र घेऊन त्याव्दारे कर्ज काढून आणखीन गाई घेण्यासाठी प्रशिक्षणासाठी आलो होतो. परंतु येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी दोन हजार शंभर रुपये मागितले. परंतु मला प्रमाणपत्र नको, मला फक्त प्रशिक्षण द्या असे म्हटल्यावर यावर मग पाचशे रुपये भरा असे सांगितले.
- गिराम, बेरोजगार, चुंबळी .ता. भूम.

बातम्या आणखी आहेत...