आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:कळंबमध्ये खासगी सावकारांकडून मोठे व्याज आकारून सर्वसामान्यांची लूट

कळंब10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गरजू लोकांना वेठीस धरून त्यांना अवाढव्य व्याजदराने पैसे देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खाजगी सावकारी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही अनेकजण कायदा धाब्यावर बसवून खाजगी सावकारी करत असून, खाजगी सावकार अवाढव्य व्याज आकारून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत.अशा प्रकारांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

किरकोळ कर्जासाठी बँका दारातही उभे करत नसल्याने गरजूंना खाजगी सावकारच जवळचा पर्याय वाटतो. कमी भांडवलात लाखो रुपये उकळता येत असल्याने कळंब शहरातील गल्लीबोळात खाजगी सावकार जाळे तयार झाले आहेत. दरमहा अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली करून कर्जदाराकडून वसुली केली जात आहे. कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्यात युवकांची संख्या लक्षणीय आहे.

सावकार हे मिळेल तेवढी रक्कम व्याजाने गोळा करत आहे. आणि त्याची मर्यादा संपली की सावकार युवकांच्या घराकडे वळत वसुलीच्या नावाखाली बदनामी आणि दबावतंत्राचा वापर करत आहेत. “तुमच्या मुलाने आमच्याकडून घेतलेल्या कर्जाचे केवळ व्याज दिले असून मुद्दल बाकी आहे. असे सांगून मुद्दलाची रक्कम आई-वडील किंवा घरातल्या सदस्यांकडून वसूल करायची, हा फंडा गेली अनेक वर्षांपासून चालू आहे. सर्वात जास्त असे प्रकार कळंब शहरात घडत आहेत. मात्र भितीपोटी कोणीही पोलीसात तक्रार करत नसल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...