आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या प्रमाणात नुकसान:वादळी पावसाने ऊस जमिनीवर लोळून नुकसान

परंडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जाकेपिंपरी येथील शेतकऱ्याचा ऊस बुधवारी (दि.३) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जमिनीवर लोटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाकेपिंपरी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात चंद्रकांत बारस्कर यांचा २ एकर तसेच हनुमंत बारस्कर यांच्या शेतातील एक एकर ऊस जमिनीवर लोळला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले. तालुका व परिसरात मागील दोन दिवसात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, सोयाबीनचे पीक पिवळी पडू लागली आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...