आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन पिकांची नुकसानीची तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना देऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार पहावयास मिळत आहे तेर ता.धाराशिव येथील शेतकरी तुकाराम तात्याबा आबदरे यांची म्होतरवाडी शिवारात गट न.२५० मध्ये ७० आर जमीन आहे. या जमिनीत आबदरे यांनी खरीप हंगाम २०२२मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.
निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेऊन त्यांनी आपले पीक प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत एँग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे ७५४ रूपये ६० पैसे विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले म्हणून त्यांनी नुकसानीची आॅनलाईन तक्रार केली. पण १८३२ रूपये भरपाई मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.