आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोगांमुळे भाज्यांची कमी ; महिन्यापासून चढे दर

बाळासाहेब माने | उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बाजार समितीसह भाजी मंडईत आवक घटली. यामुळे भाज्यांचे दर मोठ्या महिन्यापासून चढेच आहेत.

मात्र, बाजार समितीतील ठोक भावापेक्षा किरकोळ बाजारात दुप्पट दर असल्याने अनेक भाज्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजार समितीत ३५ रुपये किलोची मिरची किरकोळमध्ये ६० रुपयांना मिळते. दरम्यान, पावसाचे पाणी साचून राहिल्याने भाज्यांवर चिकटा, पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा घसरला आहे. जुलैपासून ढगाळ वातावरण व सतत पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांंनी सांगितले की, भाजीपाल्यांवर मवा, चिकटा, अळ्यांचे प्रमाण वाढले. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला काढण्यात अडचण येत आहे. परिणामी बाजारात आवक घटली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर, सेपू, मेथी, कांदापात १० ते २० रुपयाला पेंडी मिळत आहे. तसेच गवार, चवळी शेंगा, भेंडी, वांगी, कारले, फ्लॉवर, टोमॅटो सरासरी ४० ते ८० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. टोमॅटोच्या दरात सातत्याने चढउतार होत असून सध्या ३० ते ४० रुपये किलो आहे. वातावरण सामान्य झाल्यावर दर कमी होऊ शकतात.

भाज्यांवर रोगांच्या प्रादुर्भावाने आवक घटली
सतत पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. किड व रोग पडलेला भाजीपाला शेतकरी काढत नसल्याने आवक घटली आहे. त्यामुळे काही भाज्या सोडता अन्य भाज्यांचे दर चढेच आहेत.
युवराज अडसूळ, निरीक्षक, बाजार समिती, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...