आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुपालकांना मार्गदर्शन:बदलत्या वातावरणामुळे जनावरांत लंपी स्किन डिसीज ; कीटक व गोचीड निर्मूलन मोहीम हाती

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असून तालुक्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा आजार दिसून आल्यास सरपंच, ग्रामसेवकांना माहिती द्यावे असे पशुधन विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन यांच्या संदर्भीय विषयानुसार देशांमधील अकरा राज्य व महाराष्ट्रामधील अकरा जिल्ह्यात गाय वर्ग व म्हैस वर्गीय जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. या आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने डास, माशा, कीटक व गोचीड याद्वारे होतो. या रोगाची लागण जिल्हा व तालुक्यातील जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब आपल्या तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना अवगत करावी.

पशुपालकांना जनावरांच्या गोठ्यात साफसफाई व डास, माशा, कीटक व गोचीड यांचे निर्मूलन करणे विषयी मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.गावांमधील व गोठ्यामधील डास, माशा, कीटक व गोचीड यांचा प्रादुर्भाव कमी करण्या -साठी डी लेटामेथ्रिन, सायप्रेमेथ्रिन आदी औषधींचा वापर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करणे योग्य होईल. यासाठी ग्राम- स्तरावर डास, माशा, कीटक व गोचीड यांचे निर्मूलन मोहीम स्वरूपात आयोजित करणे आवश्यक आहे. यास आवश्यक निधी ग्रामपंचायत स्वनिधी मधून उपलब्ध करून देणे बाबत आपल्या तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचित करण्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...