आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण सुरू:भूममध्ये लम्पीचा पहिला बळी; 76 बाधित

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी संसर्ग वाढत असून भूम तालुक्यातील एका गायीचा पहिला मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.२२) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ७६ लम्पी बाधित पशुधन झाले आहेत. नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील २७६ कर्मचाऱ्यांच्या टीममार्फत लसीकरण सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत २ लाख पशुधनाला लस टोचली आहे. उर्वरित पशुधनाचे लसीकरणासाठी ३ लाख डोस उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार गाय, बैल व वासर आहेत. तसेच १ लाख ८० हाजर म्हशी आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून गाय, बैल व वासरे व म्हशीलाही लस देण्याचे काम सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत २ लाख पशुधनाचे लसीकरण झाले. सर्वच पशुधनाचे लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यामुळे पशुपालकांचे नुकसान होणे टळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...