आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक भ्रष्टाचाराचे व जातीवादाचे आरोप करत भांडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कोणीही दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या वेदनांचा आक्रोश राज्य सरकारला ऐकू यावा यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या बाजूस असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी शेतकऱ्यांच्या वेदनेची महाआरती करण्यात आली. यामध्ये उमरग्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सद्यस्थितीत देश व राज्यात भोंगे, हनुमान चालीसा, हिंदू- मुस्लिम हे शेतकऱ्यांचे मुद्दे नाहीत. शेतमालाला हमी भाव नाही, वीज वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पुरेशा दाबाने वीज मिळत नाही, आजही ऊसाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यातच दररोज होणारी इंधनवाढ व महागाईमुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहे. रासायनिक खताचे भाव वाढत आहेत. सध्याच्या होत असलेल्या गढूळ राजकीय अन धार्मिक वातावरणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना कळाव्यात यासाठी मंत्रालयाच्या बाजूस शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती करण्यात आली. यात कवठा येथील शेतकरी नेते विनायकराव पाटील, पंजाबराव पाटिल, माणिकराव कदम, सिकंदरभाई यांच्यासह शेकडो उमरगा तालुक्यातील शेतकरी महाआरतीत सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.