आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिवसेना व युवा सेनेकडून पाच विभागांत महाआरोग्य शिबिर; 1845 रुग्णांना चष्मे वाटप, नागरिकांचा प्रतिसाद

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२७ एप्रिलपासून एक मे पर्यंत उमरगा तालुक्यातील तुरोरी, नारंगवाडी, येणेगूर, कदेर व मुरूम या पाच विभागात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरास नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २४२५ रुग्णांची तपासणी व १८४५ जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. उस्मानाबादचे माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

महाआरोग्य शिबिराचा समारोप रविवारी (०१) मुरूम येथे जिल्हा परिषद शाळेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थित करण्यात आला. आमदार कैलास पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, भीमराव वरनाळे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, शेतकरी सेना बलभीम येवते, सुधाकर पाटील, चंद्रशेखर मुदकन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.तुरोरी विभागात ५७३ जणांची तपासणी अन ३६३ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. नारंगवाडी, येणेगूर,कदेर तसेच मुरूम विभागात ४४५ जणांची तपासणी व ३८२ जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरात एकूण दोन हजार ४२५ रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले असून एक हजार ८४५ जणांस मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

शिबिराचा यशस्वीतेसाठी योगेश तपसाळे, शरद पवार, गोपाळ जाधव, प्रवीण साठे, नेताजी पाटील, कमलाकर पाटील, इब्राहिम शेख, अमित माने, विक्रम शहापुरे, प्रशांत पोचापुरे, नागेश व्हनाळे, नागेश मंडले, कालिदास पाटील, विशाल जगदाळे, रवी वडदरे,कमलाकर आळंगे,सुधाकर पाटील,राजु पाटील, माधव पाटील, भगत माळी, जगदीश निम्बरगे, पिंटू फुगटे, प्रशांत पोचापुरे, नागेश मंडले, भिमराव फुगटे, राहुल सत्रे, यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक यांनी परिश्रम घेतले.

विविध रोगांवर तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन
या शिबिरात बालरोग चिकित्सा, डोळे तपासणी आणि गरजेनुसार चष्मा वाटप, हाडाचे विकार, लसीकरण बाबत जनजागृती, क्षयरोग-दमा,मधुमेह, हृदयरोग,पोटाचे विकार , शल्यचिकित्सक, नाक, कान, घसा तपासणी तर कर्करोग तपासणी आदी सुविधा होत्या. यासाठी उपजिल्हा रुग्णालय तालुका आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी उपचार करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...