आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्व. भीमराव महाडिक यांनी परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवणे म्हणून मोठ्या कष्टाने कारखान्याची उभारणी केली, मात्र या कारखान्याचा फायदा सभासदांना न होता विरोधकांना झाला. भीमाच्या जीवावर त्यांनी आपले खासगी कारखाने उभारून घेतले. त्या कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्पही केले आणि सहकारी तत्त्वावर चालणारा भीमा कारखाना दुर्लक्षित राहिला. त्यामुळे येणाऱ्या काळात भीमा कारखान्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन, विश्वराज महाडिक यांनी केले.भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या कातेवाडी, नजीक पिंपरी, सय्यद वरवडे, शेजबाभूळगाव आदी गावातील गृहभेट प्रचारात विश्वराज महाडिक बोलत होते.
महाडिक म्हणाले, भीमा कारखान्याचा काटा काटेकोरपणे ठेवत कोणताही उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसताना उसाला चांगला दर देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. संचालक मंडळांनी चालू हंगामात ११ रिकव्हरी आल्यावर २६०० रुपये दर जाहीर केला, विरोधक म्हणतात भीमा कारखाना आमच्याकडे द्या आम्ही २७०० रुपये प्रति टन दर देतो. यावेळी युवराज चौगुले, बापू जाधव, सीताराम मासाळ, पराग पाटील, परमेश्वर वाघमोडे, संभाजी मासाळ व इतर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.