आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी मांडले विचार:दाळींब येथे महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

दाळिंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दाळींब जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रथमत: शाळेचे मुख्याध्यापक ए.एन कोकळगावे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्राचे वाचन केले. त्यांच्या अभ्यास, वाचन, लेखन इत्यादी गुणाचे आदर्श घेण्याचे आवाहन केले. नंतर शाळेचे शिक्षक खैराटे, सुनिता पोद्दार, उज्वला बिरादार ,विनोद सूर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे ऋषिकेश सुरवसे यांनी बाबासाहेबांची अमूल्य शिकवणूक यावर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मिसबा पठाण ,इरम वरनाळे ,रूपाली दिलीप पवार, सानिका देवकते, विद्या गायकवाड, व दिपाली पवार अशा अनेक विद्यार्थ्यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोपात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुलक्षणाताई कांबळे यांनी बाबासाहेबाचे गुण आत्मसात करून जीवन जगावे असे विद्यार्थ्यांना सुचवले. सूत्रसंचालन शाळेचे वरिष्ठ शिक्षक धनराज फुरडे यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार व शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ असलम सेडमवाले, गावातीलउमेश सुरवसे , सुरज गायकवाड उपस्थित होते. दिव्यांग व प्रगतशील शेतकरी बाबू लिंगप्पा शिरोळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सुभाष सुरवसे ,धनराज भुसार प्रवीण शिंदे, हरिश्चंद्र राठोड, मुकिंदा गवळी ,बालाजी कवठे, शर्मिला कुलकर्णी ,शुद्धमत्ता भोसले ,आशा माने ,रत्नमाला सगर यांनी परिश्रम घेतले. दरम्यान जिल्हयात विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमधून डॉ. आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...