आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नदान:जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांना महाप्रसाद

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्य करणाऱ्या नळदुर्ग येथील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या वतीने श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मैलारपूर येथील जुन्या खंडोबा मंदिरात रविवारी (दि.१८) चौथ्या खेट्यानिमित्त महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. जुन्या खंडोबा मंदिरात सुरू करण्यात आलेल्या अन्नदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव वऱ्हाडे यांचेही योगदान लाभले. या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ व शिवाजीराव वऱ्हाडे यांना मिळाला आहे.

धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा लाभ रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी घेतला. धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाचे पिंटू जाधव, सुनिल गव्हाणे, गणेश मोरडे, निरंजन कोप्पा, नेताजी मुळे, संतोष जाधव, अण्णाराव जाधव, संकेत स्वामी, रोहित वाले, बबन जाधव, तात्या जाधव व स्वप्निल गव्हाणे यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. या अन्नदानाचा शुभारंभ श्री खंडोबा देवाला नैवेद्य दाखवून करण्यात आला. यावेळी मंडळाचे उमेश जाधव, पिंटू जाधव, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, सुहास येडगे, विलास येडगे, विशाल डुकरे, अमर भाळे, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...