आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंब तालुका:महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी; तर भाजप युतीनेही करिष्मा दाखवला

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींची निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून आले तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेच्या युतीने सुध्दा करिष्मा दाखवला आहे. कळंब तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण तापले होते. दिनांक १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. दिनांक २० डिसेंबर रोजी मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आली आहे. या करिता १६ टेबल लावण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी काम पाहिले आहे. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

८ ग्रा.पं.वर मविआ
ग्रामपंचायतीच्या निवडणूक ग्राम पातळीच्या परिस्थितीनुसार पॅनल उभारण्यात आले होते. काही ठिकाणी तर सर्व पक्षीयचा सुध्दा प्रयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कुंभार व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते यांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी ग्राम पातळीवर महाविकास आघाडी चा प्रयोग यशस्वी झाला आहे. या मध्ये डिकसळ, खडकी, तांदुळवाडी, नागुलगाव, बाभळगाव, करंजकल्ला, शेळका, धानोरा या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी ने विजय मिळविला आहे.

सहा ग्रामपंचायतींवर भगवा
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सौंदणा (अंबा), वाघोली, अंदोरा, लोहटा (पुर्व), नागझरवाडी, गौरगाव या सहा ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने वाठवडा येथील सत्ता काबीज केली आहे. भाजपाने लोहटा (पश्चिम), गौर, बोरगाव, गोविंदपूर, कोथळा, हिंगणगाव यासह ठिकाणी सरपंच पद काबीज करुन सत्ता स्थापन केली आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेची खामसवाडी ही ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपली ताकद दाखवली आहे. भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीने शिराढोण, रत्नापुर, हासेगाव (के), हासेगाव (शि) या चार ठिकाणी ग्रामपंचायत ताब्यात घेऊन करिष्मा दाखवला आहे.

मस्सा (खं.) भाजप व राष्ट्रवादीचा दावा
तालुक्यातील मस्सा (खं) येथील ग्रामपंचायत मोठी असून यावर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. तर निपाणी या ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा केला आहे.

मोहा येथे युवा ग्रामविकास पॅनलच्या हाती सत्ता
मोहा येथे जिल्हा परिषद माजी सदस्य संदीप मडके यांनी युवा ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून पुर्ण एक हाती बहुमत घेतले आहे. गाव पातळीवर आघाडी करून आवड शिरपुरा येथे युवा ग्राम परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून सत्तेची चावी हाती घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...