आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:महायुतीच्या लक्ष्मी म्हेत्रे‎ शिराढोणच्या सरपंचपदी‎

शिराढोण‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायतीच्या‎ सरपंचपदाचा पदभार महायुतीच्या‎ लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांनी बुधवारी‎ (दि.४) स्वीकारला. तर उपसरपंच‎ निवडीत महाविकास आघाडीच्या‎ सहा सदस्यांचा पाठिंबा मिळवत‎ भाजपच्या दुसऱ्या गटाचे अमोल‎ माकोडे उपसरपंचपदी विराजमान‎ झाले.‎ नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत‎ निवडणुकीत भाजपचे पद्माकर‎ पाटील व शिंदे गटाचे नितीन लक्ष्मण‎ पाटील यांनी महायुतीच्या‎ माध्यमातून तर भाजपच्याच दुसऱ्या‎ गटाचे अमोल माकोडे यांनी‎ स्वतःच्या नेतृत्वातील स्वतंत्र पॅनल‎ तयार केला होता.

पुणे येथे उद्योजक‎ महणून स्थिरावलेले शिराढोण‎ येथील सलिम शेख यांनी‎ महाविकास आघाडीच्या‎ माध्यमातून १० जागा लढवत‎ निवडणूक चुरशीची केली होती.‎ अटीतटीच्या निवडणुकीत‎ सरपंचपदासाठी महायुतीच्या लक्ष्मी‎ दिलीप म्हेत्रे यांनी झालेल्या‎ मतदानापैकी ४० टक्के मते मिळवत‎ विजय संपादन केला. तसेच‎ सदस्यपदी सात जणांना निवडून‎ आणण्यात त्यांना यश आले.‎ अमोल माकोडे यांनी स्वतःसह‎ एकूण चार जणांना निवडून आणले.‎

महाविकास आघाडीच्या पॅनलमधून‎ निवडणूक लढलेल्या १० पैकी ६‎ सदस्यांना या निवडणूकीत यश‎ मिळाले. शिराढोण येथे तीन पैकी‎ एकाही पॅनलला संपूर्ण बहुमत‎ मिळाले नाही. त्यामुळे‎ उपसरपंचपदाच्या निवडणुकीत‎ महाविकास आघाडीने भाजपच्याच‎ दुसऱ्या गटाचे अमोल माकोडे यांना‎ पाठिंबा देत उपसरपंचपदी‎ विराजमान केले.‎

बातम्या आणखी आहेत...