आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तेरमध्ये माहेर मंगळागौर उत्सव जल्लोषात; अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम महिलांची मोठी उपस्थिती

तेर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यात येणारा मंगळागौर हा सण महिलामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो. तेर मधील माहेर मंगळागौर उत्सवात ग्रामीण भागातील महिलांनी झिम्मा फुगडी सोबतच पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. जि.प.च्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून माहेर मंगळागौर उत्सव गेली अनेक वर्षांपासून तेर मध्ये संपन्न होत आहे.यावर्षी बुधवार दि.३ आॅगस्ट रोजी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर सख्यांंच्या उपस्थितीत पार पडला .

या उत्सवासाठी यावर्षी मुंबई येथील कलापथकास पाचारण करण्यात आले होते. या उत्सवात मंगळा गौरी सणाबरोबर माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके बांधण्यात आले होते,मेहंदी,बांगड्या ,वाण,मंगळागौरी,झिम्मा,फुगडी,घागर फुंकणे,आदी खेळासोबतच सासू सुनेचे भांडण सवतीचे भांडण आगोटा पागोटा ,देवीचे गाणे,नृत्य असै भरगच्च कार्यक्रमात सख्यानी सहभाग नोंदवला परंपरागतरित्या श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी हा मंगळागौर सण साजरा करण्यात येतो .सकाळी अर्चनाताई पाटील यांनी मंगळागौरीच्या प्रतिमेचे विधीवत पुजन केले.रात्री उशिरा तेरणा नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.

या महोत्सवात विशेष करून नऊ वारी साडी नाकात नथ,डोक्यावर गजरा अशा मराठमोळ्या साज परीधान करून तेर परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण मोठया प्रमाणावर होते. शहरापेक्षा ग्रामीण भागात हे प्रमाण चांगले आहे. कुटुंबे जोडण्यासाठी व संस्कृती संवर्धनासाठी मंगळागौर उत्सवाचे महत्व मोठे आहे.

१३ वर्षांपासून आयोजन
नागपंचमी सणासाठी माहेरला येणाऱ्या नववधूना व ग्रामीण भागातील महिलांना आपले पारंपरिक खेळ सादर करता यावे यासाठी अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत आहे.गेली १२ ते १३ वर्षांपासून हा उत्सव तेर सारख्या ग्रामीण भागात महिलांसाठी एक पर्वणीच ठरत असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...