आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील हासेगाव (के) येथे मनिषा विलास पाटील या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तसेच उपसरपंचपदीही रुपाली प्रदीप खरडकर यांची निवड झाल्याने गावात महिलाराज आले आहे. हासेगाव (के) येथील पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचा जय हनुमान ग्राम विकास पॅनल व सर्वपक्षीय नागेश्वर ग्रामविकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती.
यामध्ये विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जय हनुमान ग्राम विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार मनिषा पाटील यांच्यासह पॅनलचे सात सदस्य निवडून येत बहुमत प्रस्थापित केले. नागेश्वर ग्रामविकास पॅनलचे फक्त दोन सदस्य निवडून आले. गुरुवारी (दि.५) उपसरपंच निवडीची प्रक्रिया घेण्यात आली.
यामध्ये जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून रुपाली प्रदीप खरडकर तर नागेश्वर ग्रामविकास पॅनलकडून रामेश्वर धुमाळ यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. यात आठ मते घेऊन रुपाली खरडकर यांनी विजय संपादन केल्याने त्या उपसरपंच पदावर विराजमान झाल्या. धुमाळ यांना फक्त दोन मते पडली. निवडीनंतर नूतन सरपंच मनिषा विलास पाटील, उपसरपंच रुपाली प्रदीप खरडकर, लक्ष्मीबाई सोनटक्के, महावीर सावळे, रामलिंग धुमाळ, मीनाबाई धुमाळ, पार्वती चौरे, महादेव यादव, संजीवनी खरडकर यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात १५ महिला सरपंच तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. दरम्यान, हासेगावसह तालुक्यातील आणखी दोन-तीन ग्रामपंचायतींवर महिलाच विराजमान झाल्या आहेत.
ग्रामपंचायत गावातील गुणवंत मुलींना दत्तक घेणार
हासेगाव (के) येथील ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच या महिला आहेत. त्यामुळे आम्ही गावातील गुणवंत मुलींना ग्रामपंचायतीमार्फत दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेणार आहोत. गावातील महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याकडे लक्ष असणार आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका कक्ष उभारण्यात येणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. तसेच महिलांच्या आरोग्यासाठीही पावले उचरणार. - मनिषा विलास पाटील, सरपंच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.