आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत बाभळगांव येथे सरपंच सुजाता तुषार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी विजयश्री नानासाहेब वाघमारे व प्रेमनाथ मधुकर वाघमारे यांचे अर्ज प्राप्त झाले. परंतु प्रेमनाथ वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व विजयश्री वाघमारे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी एस एस पाटूळे यांनी घोषीत केले.
नुकत्याच पार पडलेल्या बाभळगांव ग्रामपंचायत निवडनुकीमध्ये मेसाईदेवी युवा ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला होता, नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत यावेळी सरपंच पदासद पाचही महिला सदस्य निवडून आलेल्या आहे.
याप्रसंगी माजी सरपंच आसराम वाघमारे नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांना शुभेच्छा देत आपल्या नेतृत्वाखाली बाभळगांव विकासाच्या प्रगतीपथावर निश्चितच एक वेगळी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आसराम वाघमारे,प्रभाकर अंगरखे,भाग्यश्री चौघुले, प्रेमनाथ वाघमारे,सविता वाघमारे,अर्चना कांबळे,नवनाथ वाघमारे,दैवशाला वाघमारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर सत्कार प्रसंगी पोलीस पाटील एकनाथ बळीराम पाटील, ग्रामसेवक बारकुल उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.