आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:परंडा शहरातील मुख्य मार्गाचे 18 कोटींतून होणार मजबुतीकरण ; सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

परंडा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मार्गाच्या मजबुतीकरणासाठी १८ कोटींचा निधी मिळाला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक मार्गाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते शनिवारी (दि.१९) झाले. हा मार्ग १० वर्षांपासून निधीअभावी रखडला होता. खड्ड्यांमुळे वाहनचालक व पदचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. या मार्गाच्या कामासाठी माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी पाठपुरावा केला. पालकमंत्री सावंत यांच्याकडे निधीसाठी मागणी केली होती. मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुढाकार घेत सदर रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी रुपये निधी मंजूर करून कामाचा शुभारंभ केला.

यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ले, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, उद्योजक काकासाहेब साळुंके, रिपाइं प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शाम मोरे, शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवा शहरप्रमुख वैभव पवार, माजी नगरसेवक संजय घाडगे, शरीफ तांबोळी, समीर पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...