आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारेवरची कसरत:मुख्य रस्त्यांना नाही राहिल्या साईड पट्ट्या ; अपघातांचा धोका वाढला

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबरोबर साईड पट्ट्याच राहिल्या नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.शहराला जोडणाऱ्या वाशी कळंब,वाशी येरमाळा,वाशी शहर ते कण्हेरी पाटी,तांदूळवाडी,पारा, पिंपळगाव(लिंगी) या प्रमुख रस्त्यावर सातत्याने रहदारी असते. आधीच या रस्त्यापैकी बहुतांश रस्ते जागी राहिलेले नाहीत. जागोजागी खड्डे पडलेले असल्याने वाहन धारक तारेवरची कसरत करत आहेत. त्यातच सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने प्रमुख रस्ता असलेल्या वाशी कळंब,वाशी इंदापूर मार्गे येरमाळा,पारा,तांदूळवाडी या रस्त्यावर ऊसाची अवजड भरलेली वाहने चालवताना वाहन चालकास अतिशय वैताग येत आहे.

उसाची भरलेली वाहने ही सायंकाळी ६ नंतर वाहतूक करत असल्याने या दरम्यान शहराकडे येणारी वाहने,शेतातून परतणारे शेतकरी यांना साइड पट्टयाच राहिलेल्या नसल्याने या वाहनाच्या मागे चालावे लागत आहे. या दरम्यान बाजूने जायचे म्हणले तर पट्ट्या या झाडांच्या फांद्यांनी व्यापून गेलेल्या असल्याने ते शक्य होत नाही. दुचाकीस्वार पुढे निघताना त्यांना या फांद्यांचा फटका लागून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उंच ऊस भरलेल्या वाहनांना वरील फांद्या लागून वाहन पुढे सरकताना मागे असलेल्या वाहनावर पडून त्यांचे नुकसान होऊन नागरिक जखमी होत आहेत.या समस्येकडे बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तरी चालेल फक्त मोकळे करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...