आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास आराखडा बनवा ; कार्यकारी संचालक मोपलवारांची सूचना

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यापूर्वीच्या तुळजापूर विकास प्राधिकरणातील चुका सुधारून भाविकांना केंद्रस्थानी ठेवून भविष्यातील भाविकांची वाढती गर्दी विचारात घेऊन सर्वांगीन विकास आराखडा तयार करण्याचा सूचना एमएमआरडीएचे कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांनी केली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित बैठकीत मोपलवार बोलत होते. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्ह, सार्वजनिक बांधकाम, सल्लागार कंपनी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विकास आराखडा तयार करताना भाविकांसह पुजारी, व्यावसायिकांच्या हिताचा विचार करण्याची सूचना मोपलवार यांनी केली.

तसेच राज्य सरकार विकास आराखड्या विषयी गंभीर असल्याचे सांगून तातडीने सर्वकष आराखडा सादर करण्याचा सूचना मोपलवार यांनी यावेळी केल्या. तत्पूर्वी राधेश्याम मोपलवार यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. देवी दर्शनानंतर मंदिर कार्यालयात मंदिर संस्थानच्या वतीने राधेश्याम मोपलवार यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...