आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे १६ विद्यार्थी राज्य पुरस्कार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यशाबद्दल गुरूवारी मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक परमेश्वर कोळी यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर सुतार, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे, दुष्यंत कांबळे उपस्थित होते. भारत स्काउट व गाइडच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये शालेय शीस्त, समाजसेवा, राष्ट्रभक्ती व नैतिक मूल्यांचा विकास व्हावा. देशाच्या रक्षणासाठी सैन्य व पोलिस दलाचे प्रशिक्षण मिळावे, शौर्याची प्रेरणा मिळावा, यासाठी सहशालेय उपक्रम राबवला जातो.
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्काउट व गाइड शिबिरात सहभाग घेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत वाढीव गुण मिळतात.
तसेच संरक्षण दल, रेल्वे भरती व इतर नोकरीत प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे स्काउट गाइडला खूप महत्त्व आहे. कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे यांच्या मार्गदर्शनात स्काउट व गाइड प्रशिक्षक परमेश्वर कोळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सण-उत्सव, समाजसेवा, सहशालेय उपक्रम तसेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे स्काउट व गाइड संचालन, शासकीय शिबिरात सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य करत आहेत. आतापर्यंत या स्काउट गाइडचा लाभ घेवून विद्यालयातील अनेक विद्यार्थी शासकीय सेवा व सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.