आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीचे मोठे नुकसान:मानेगोपाळचा पाझर तलाव फुटला

उमरगा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यात वीज पडून एक म्हैस दगावली तर मानेगोपाळ येथील पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

तालुक्यातील जवळपास सर्वच तलाव ओव्हर फ्लो होवून ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वीज पडून बेडगा येथील सुधाकर दामाजी माने यांची म्हैस दगावली आहे. त्यातच पाझर तलाव फुटल्याने शेतीमधील माती वाहून गेली आहे. उभी असलेली पिके पाण्यामुळे आडवी झाली आहेत. काढणीला आलेला मुग आणि उडीद पिकांचे शेतामध्ये पाणी साचले आहे.

बातम्या आणखी आहेत...