आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील व्हंताळ येथे जिल्हा रेशीम कार्यालय, तहसील कार्यालय, उमेद अभियान व रोजगार हमी योजना पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने व्हंताळ येथे हनुमान मंदिरात शेतकरी व ग्रामस्थांची रेशीम लागवड कार्यशाळा घेण्यात आली. दरम्यान, रेशीम उत्पादन चांगले असून कोषांना बाजारात ७०० ते ८०० रुपये किलोने विक्री होत असल्याचे सांगितले.
रेशीम कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच माधव जाधव होते. यावेळी जिल्हा रेशीम तांत्रिक सहाय्यक सुधीर बंडगर, तालुका समन्वयक सुनील कांबळे, सह कार्यक्रम अधिकारी डी. डी. चव्हाण, उमेद कक्ष तालुका व्यवस्थापक बाबासाहेब नाईक, उमेद कृषी उपजीविका व्यवस्थापक किशोर औरादे, ग्रामसेवक कलशेट्टी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सुधीर बंडगर यांनी शेतकऱ्यांनी एक एकरात तुती लागवड करून ऊसापेक्षा दुप्पट उत्पादन घेतले आहे. ग्रामीण भागात शेतीशी निगडीत असलेल्या या रेशीम उद्योगातून अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होवून युवक शहरांकडे जाणारा लोंढा थांबवण्यात काही प्रमाणात मदत झालेली आहे.
काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी एकात्मिक शेती करण्याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये इतर पिकांबरोबरच रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगाचा विचार करणे व अंमलात आणणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी चव्हाण यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड आणि रेशीम उद्योगासाठी तीन वर्षासाठी तीन लाख ४२ हजार रुपये अनुदान असल्याचे सांगितले. यावेळी सुनील कांबळे यांनी विविध फळबाग व लागवड योजनेविषयी माहिती दिली.
रेशीम कोषांची ८०० रुपये किलोने विक्री
उमेद तालुका कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी शेतकऱ्यांनी एकही रुपया स्वतःचा खर्च न करता रोहयो अंतर्गत तुती लागवड, शेड उभारणीतून वर्षाकाठी कमीत कमी दीड ते तीन लाखापर्यंत उत्पादन एक एकरात शेतकऱ्यांना घेता येते. योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. बाजारपेठेत प्रति किलो ७०० ते ८०० रुपये दराने रेशीम कोष खरेदी केले जाते, असे सांगितले.
या कार्यशाळेसाठी महेश पाटील, हबीब अत्तार, सुधीर पाटील, रघुनाथ जाधव, इंद्रजीत पाटील, एकनाथ जाधव, तुळशीराम गायकवाड, मधुकर जाधव, निळकंठ कांबळे, जयश्री सगर, आशा पवार यांनी पुढाकार घेतला. दत्तात्रय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रसूल अत्तार यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.