आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी समस्या:भुयारी गटारीचे चेंबर तुंबून तुळजापुरात घाण रस्त्यावर, अनेक नागरिक हैराण; कुंभार गल्ली, वेताळनगरमध्ये पालिकेच्या कारभारावर संताप

तुळजापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुयारी गटारीचे चेंबर तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याचा प्रकार कुंभार गल्ली येथे शुक्रवार (दि. ६) घडला. या घाणीतूनच वेताळ नगर, कुंभार गल्ली परिसरातील भाविकांना तुळजाभवानी मंदिरात जावे लागले. दरम्यान शहर स्वच्छते साठी दिवसाला ५० हजार रुपये खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील घाटशिळ रोड भागातील घाण वाहून नेणाऱ्या भुयारी गटारीचे चेंबर तुंबल्याचा प्रकार कुंभार गल्लीत वाहनतळाच्या कोपऱ्यावर घडला. चेंबरमधून दुर्गंधीयुक्त घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांसह भाविकांना घाणीतूनच रस्ता पार करावा लागला. शुक्रवार देवीचा वार असल्याने सकाळी तुळजाभवानी मातेचा दर्शनासाठी घाईत निघालेल्या भाविकांना घाणीतूनच रस्ता पार करावा लागल्याने पालिकेच्या कारभारा वर संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून गटार तुंबली असून, हा प्रकार परिसरातील नागरिकांनी पालिकेला कळवल्या नंतर पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

● शहर स्वच्छतेसाठी ५० हजार रुपये खर्च
शहर स्वच्छतेचा ठेका समृध्दी इनफ्रा स्ट्रक्चर प्रा. ली. पुणे या कंपनीला देण्यात आला असून शहर स्वच्छतेसाठी पालिका महिन्याला १५ लाख रुपये खासगी कंपनीला मोजत आहे. मात्र लाखो रुपये मोजूनही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र ठेक्यातील अटी शर्ती नुसार ठेकेदारावर कारवाई करण्यात पालिका टाळाटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात अशा प्रकारची अस्वच्छता होण्याचे अनेक प्रकार याहीपूर्वी घडले आहेत. लोकांची व भाविकांची गैरसोय होते, लोक तेवढ्यापुरते सहन करतात, पुन्हा नव्याने समस्या होतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...