आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अनेक शेतकऱ्यांच्या पदरात अजून छदामही नाही; विमा कंपन्यांनी सरसकट विमा देण्याची मागणी

तामलवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर महिन्यात तुळजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जवळपास ६९ हजार २१५ हेक्टर वरील पीके वाया गेली असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले असून बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकरी हतबल झाले असून, त्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचा हात देण्याची अत्यंत गरज आहे. सध्या महसूल व कृषी विभागाने पंचनामे केली असून त्याचा अहवालही शासनाकडे पाठवला आहे. त्याच धर्तीवर विमा कंपनीने सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचा हात द्यावा, त्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करावा अशी मागणी आहे. जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी विरोधी पक्षाचे प्रतिनिधी व विविध शेतकरी संघटना पुढे आल्या आहेत.

या संघटना जिल्हानिहाय पालकमंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनेही कृषीमंत्री, महसूलमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठवित आहेत. इतकेच नाहीतर काहीजणांनी थेट पंतप्रधानांनाही निवेदने पाठविली आहेत. इतकी मोठी हानी होवूनही राज्याचे मंत्रीगण बळीराजाला मदत देण्यासाठी हालचाल करत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिकं गुडघाभर पाण्यात डोळ्यादेखत वाहून गेली आहेत.

छाटणी लांबणीवर
कोरोनामुळे द्राक्ष बागांची आर्थिक हानी झाली. यंदाही अतिवृष्टी झाल्याने बागांची छाटणी लांबणार आहे. वातावरण असेच राहिले तर बागा धरणे कठीण होणार आहे. एकरी लाखो रूपयांचा खर्च करून द्राक्षबागा हाताला लागतील की अवकाळी पावसाने जातील? या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. -यशवंत कुलकर्णी, द्राक्ष बागायतदार

पीक विमा द्या
तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. काढणीला आलेली सोयाबीन पूर्णपणे वाया गेली आहे. शेतकऱ्यांना अनुदानासह पीक विमा तत्काळ द्यावा. - अविनाश गाटे, शेतकरी, दहिवडी

बातम्या आणखी आहेत...