आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील आठवड्यात रेल्वे विभागाने मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी नविन रेल्वे सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. ऑक्टोंबरमध्ये केलेल्या आंदोलनामुळे हे शक्य झाल्याचा दावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला.ओमराजे म्हणाले की, रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षांसह काही सदस्यांनी राजीनामे देत जोरदार टिका केल्यानंतर रेल्वेचे अधिकारी सरळ झाले.
१८ ऑक्टोबरला पुणे येथे विभागीय रेल्वे समितीची बैठक झाली. समितीचे अध्यक्ष माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांच्यासह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर इतर खासदार उपस्थित होते. कोरोना काळात रेल्वे बोर्डाने बंद केलेल्या ट्रेन निर्बंध शिथील झाल्यावर पुर्ववत सुरु केल्या नव्हत्या. मागील २ वर्षापासून रेल्वे अधिकाऱ्यांकडे खासदार राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा करुनही दखल घेतली नव्हती.
त्यामुळे या सर्व खासदारांनी समितीच्या बैठकीत जाब विचारला. समितीचे अध्यक्ष खासदार नाईक निंबाळकर, खासदार राजेनिंबाळकर यांनी संतप्त होत राजीनामा देत बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा उचलला. मागणीची दखल घेत अखेर रेल्वे सुरू केल्या.
उस्मानाबाद ते तिरूपती, गुलबर्गा ते मुंबई ट्रेन सुरू
उस्मानाबाद, लातूर ते तिरुपती, आणि मुंबई साठी आणखी १ नविन गाडी गुलबर्गा ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या दोन नविन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. अनेक दिवसांपासून बंद असलेली अमरावती-पुणे ही द्विसाप्ताहिक गाडी सुरु केली आहे. अर्थात पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ही गाडी अधिक सोयीची होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.