आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा स्थळाची पाहणी:परंड्यात आज मराठा समाजाचा महामाेर्चा ; पुन्हा एकदा घडणार शिस्तीचे दर्शन

परंडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिस्तीचा वस्तूपाठ घालून देणारा व संविधानिक पध्दतीने मागण्या मांडणाऱ्या मराठा समाजाकडून परंड्यात मंगळवारी भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकल मराठा समाजातर्फे होणाऱ्या या महामोर्चाची जय्यत तयारी झाली असून, हजारो बांधव सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपाधीक्षक एम. रमेश यांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, पोलिस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे उपस्थित होते.

महामोर्चासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपविभागीय अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, २४ पोलीस उपनिरीक्षक, ७५ महिला पोलीस, २०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. सकल मराठा आरक्षण महामोर्चास मंगळवारी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून प्रारंभ होईल. नाथ चौक, संतसेना महाराज चौक, खासापुरी चौक, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गावरुन कोटला मैदानावर आल्यानंतर भाषणे होणार आहेत. मोर्चाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, मुस्लीम समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. तालुक्याबाहेरूनही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आयोजकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...