आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात सहा लाख ४२ हजार ५१२ जणांना कोरोनाची लागन झाली. पैकी सहा लाख २४ हजार ९२७ जण बरे झाले असून १७ हजार १३६ जणांचा यात मृत्यू झाला. कोरोनाची लागण होण्यापासून रुग्ण बरे होण्यात, मृत्यू होण्यात तसेच सध्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत औरंगाबाद जिल्हा सर्वात पुढे आहे. त्यानंतर बीड जिल्हा असल्याचे ११ डिसेंबरच्या अहवालावरून समोर आले.
मराठवाड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २३ मार्च २०२० रोजी औरंगाबाद मध्ये एन-१ येथील काळा गणपती मंदिर परिसरात हा रुग्ण सापडला. पहिला रुग्ण राजधानीत मग इतर जिल्ह्यांत, मग तालुक्यात, त्यानंतर मोठे गाव स्तरावर आणि नंतर सर्वच गावांत आणि अनेक घरांमध्ये रुग्ण आढळून येत होते. दीड वर्षाच्या काळात कोरोना संसर्गाच्या दोन वेगवेगळ्या लाटांचा सामना नागरिकांनी केला आहे. आगामी काळात सुरक्षितता पाळली नाही तर आणखी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मराठवाड्याची माहिती घेतली असता आतापर्यंत कोरोनाच्या बाबतीत औरंगाबाद शहर आणि जिल्हा सर्वच ठिकाणी अग्रेसर असल्याचे दिसून आले. त्यापाठाेपाठ बीड जिल्ह्याचा नंबर लागतो. मराठवाड्यात चार महानगरपालिका आहे. अशा स्थितीतही बीडने अन्य तीन मनपाला मागे टाकल्याचे चित्र आकडेवारीतून समोर आले.
हिंगोलीत सर्वात कमी मृत्यू
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्णांचे ५०७ मृत्यू झाले आहेत. तशी लागण कमी होण्याच्या प्रमाणात हिंगोलीचाच क्रमांक लागतो. त्याचबरोबर सध्या अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांतही हिंगोली तळाशी आहे. येथे शनिवारी केवळ पाच रुग्ण पूर्ण जिल्ह्यात उपचार घेत होते.
तिसरी लाट थोपवण्यासाठी काळजी आवश्यक
मराठवाड्यातील नागरिकांनी काेरोनाचा संयमाने मुकाबला करून दोन्ही लाटांना थोपवले आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी भयभीत न होता लसीकरण करण्यासह मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी करणे टाळणे, गर्दीत जाणे टाळणे, स्वत: होऊन काही प्रमाणात निर्बंध लावून घेतल्यास रुग्णसंख्या वाढणार नाही. -डॉ. शिवकुमार हालकुडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.