आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मराठवाडा अपंग विकास मंडळाचे तहसिलदारांना निवेदन

भूम7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विधवा निराधार महिलांना शासनाच्या निराधार योजने अंतर्गत तात्काळ प्रस्ताव मंजूर करुन मानधन चालू करण्याची मागणी मराठवाडा अपंग विकास मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ लोखंडे यांनी तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.मराठवाडा अपंग विकास मंडळाने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , तालुक्यात गावोगावी असंख्य महिला विधवा , निराधार आहेत. त्यांचे आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केले आहेत. निराधार महिलांचे प्रस्ताव अदयाप मंजूर झालेले नाहीत.

यामुळे त्यांना अनेक दिवसांपासून मानधन मिळत नाहीत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . तसेच असंख्य महिला या प्रस्ताव तयार करून आहेत अशा महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन करुन त्यांचे आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पुर्तता करून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

तरी प्रस्तावित असलेले व दाखल करत असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ मंजूर करून मानधन देण्यात यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वंचित निराधार , विधवा महिलांना दिलासा दयावा अशी मागणी तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्याकडे निवेदनाव्दारे मराठवाडा अपंग विकास मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ लोखंडे व सचिव ए .बी. वायकर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...