आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन:मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी यूपीतील सैनिकाला तुळजापुरात मिळाले हौतात्म्य

उस्मानाबाद / चंद्रसेन देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
१९८४ मध्ये सिरोही कुटुंबीयांनी जमादार हरिराजसिंग यांच्या स्मारकाला भेट दिली तो क्षण - Divya Marathi
१९८४ मध्ये सिरोही कुटुंबीयांनी जमादार हरिराजसिंग यांच्या स्मारकाला भेट दिली तो क्षण

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानंतर भारतीय सैन्य दलाने निजाम संस्थानविरुद्ध लढाई सुरू केली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या फौजेशी लढताना जमादार हरिराजसिंग (उत्तर प्रदेश) व जमादार मांगेराम (हरियाणा) यांना वीरमरण आले. उभयतांचे स्मारक तुळजापुरात बांधण्यात आले असले तरी ते दुर्लक्षित आहे. हरिराजसिंग यांचे वंशज नुकतेच तुळजापुरात येऊन गेले. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून स्मारकाच्या पुनर्बांधणीची मागणी केली. स्मारक पुनर्बांधणीबाबत राज्याच्या गृह विभागालाही पत्रव्यवहार करण्यात आला. हरिराजसिंग यांचे पुत्र कर्नलपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांचे नातू, पुतणे, जावई सैन्यदलात कर्नलपदावर आहेत.

निजामाविरुद्ध लढाई सुरू झाली तेव्हा १३ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थानात भारतीय सैन्यातील ३ कॅव्हलरी बटालियनने भाग घेतला. तुळजापुरातून सुरू झालेल्या या लढाईदरम्यान भारतीय सैन्याचे जमादार हरिराजसिंग आणि जमादार मांगेराम यांना वीरमरण आले. सरकारच्या वतीने त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक स्मारक बनवण्यात आले. यातील हरिराजसिंग यांचे वंशज आपल्या पूर्वजांचे स्मारक शोधत तुळजापूरला आल्याने शहीद सैनिकाच्या घराण्याचा इतिहास प्रकाशात आला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचे अभ्यासक डॉ. सतीश कदम यांच्याशी हरिराजसिंग यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. हरिराजसिंग यांचे आजोबा हरनामसिंग सिरोही हे ब्रिटिश काळात रिसालदार पदावर कार्यरत होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेला होता. त्यांचे पुत्र खजानसिंग यांची दोन मुले गजराज आणि हरिराज हे भारतीय सैन्यात दाखल झाली. गजराजसिंग हे शहीद जवानाचे थोरले भाऊ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या संरक्षण विभागाचे प्रमुख होते. पुढे त्यांचा मुलगा विनोद हे सैन्यात दाखल होऊन ते कर्नल झाले. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून हरिराजसिंग यांचे घराणे सैन्यात असून गेल्या शंभर वर्षांत या घराण्यातील पाच ते सहा जण मेजर कर्नल यासारख्या पदावर पोहोचले आहेत.

२७ व्या वर्षी हरिराजसिंगांना वीरमरण

असा आहे हरिराजसिंग यांचा इतिहास : डॉ. सतीश कदम म्हणाले, जवान हरिराजसिंग हे ३ कॅव्हलरी या तोफगोळा विभागात भरती झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव चमनकौर. त्यांना देवेंद्रसिंग आणि सरलादेवी ही दोन अपत्ये. सरलादेवीचे पती केपीएस लांबा हे सैन्यात कर्नल झाले, तर पुत्र देवेंद्रसिंग हेही सैन्यात कर्नल होऊन त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घेतला. देवेंद्रसिंग यांचे चिरंजीव विवेक हेही सैन्यात कर्नल आहेत. ३ मुलींपैकी दीपिका आणि गीतिका यांचे पती सध्या सैन्यात कर्नल आहेत. दीपिकाचे पती कर्नल नवनीत डागर हे अहमदनगर येथे कार्यरत आहेत.

१९८४ ला पहिल्यांदा घेतले समाधीचे दर्शन : शहिद हरिराजसिंग यांची तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाधी आहे. हरिराजसिंग शहीद झाले तेव्हा त्यांचे पुत्र कर्नल देवेंद्रसिंग सिरोही अवघ्या तीन वर्षांचे होते. १९८४ मध्ये देवेंद्रसिंग यांच्यासह सिरोही कुटुंबीयांनी प्रथम तुळजापुरात येऊन शहीद हरिराजसिंग यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सिरोही परिवार अधूनमधून तुळजापुरात समाधीच्या दर्शनासाठी येत आहे. स्थानिकांना या परिवाराबद्दल फारशी माहिती अवगत नव्हती. २०२१ च्या मार्च महिन्यात देवेंद्रसिंग कुटुंबासह तुळजापुरात येऊन गेले. त्यांनी हरिराजसिंग यांच्या समाधिस्थळाची स्वच्छता करून दर्शन घेतले. दुर्लक्षित समाधीचे पुनर्निनिर्माण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी आणि तुळजापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

उचित स्मारक व्हावे
आमचे वडील नगरच्या कॅम्पमध्ये होते. घटना घडली तेव्हा आम्ही कुटुंबासह गावी होतो. आम्ही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यदलात सेवा केली. कर्नलपदावरून निवृत्त झालो असलो तरी माझा परिवार सैन्यातच आहे. आमच्या वडिलांचे तुळजापुरात उचित स्मारक व्हावे एवढीच अपेक्षा आहे. - देवेंद्रसिंग सिरोही, हरिराजसिंग यांचे चिरंजीव.

... नंतर मुलेही झाली लष्करात अधिकारी
शहीद हरिराजसिंग यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील परतापूर आहे. त्यांचे पुत्र कर्नल देवेंद्रसिंग हे मेरठ येथे स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे हरिराजसिंग वयाच्या २७ व्या वर्षी शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी चमनकौर याही पतीच्या दु:खाने दोनच वर्षांत मरण पावल्या. तेव्हा शहिदाच्या मुलाचा सांभाळ चुलत्याने करून त्यांनाही सैन्यात अधिकारी बनवले.

बातम्या आणखी आहेत...