आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल किचनची योजना:सेंट्रल किचनच्या विरोधात उस्मानाबादमध्ये मोर्चा

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका शाळांसाठी शासनाने पोषण आहार पुरवण्यासाठी सेंट्रल किचनची योजना सुरू करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथेही याचे कंत्राट एकाला देण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ उद्रेक सुरू झाला असून महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.

प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देण्यात येत असतो. मात्र, आता शासानाने शाळेत आहार शिजवणे बंद करून सेंट्रल किचन सुरू करून आहार वाटपाचे नियोजन सुरू केले आहे. उस्मानाबादचेही कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, सीटू अंतर्गत महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये कंत्राट घेणाऱ्याच्या विरोधातही तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. यावेळी महिलांनी जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी सेंट्रल किचन प्रणाली बंद करणे, मानधनात वाढ करणे, शासकीय सेवेत समायोजित करावे, तेलाचा पुरवठा करावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षा कुसुम देशमुख यांच्यासह अनेक पोषण आहार योजनेतील अनेक महिला कामगार सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...