आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मंगळवारी परंड्यात माेर्चा काढण्यात आला. या वेळी एक लाख माेर्चेकरी आल्याचा दावा आयाेजकांनी केला.
महिनाभरापासून सकल मराठा समाजाची मोर्चाची तयारी सुरू होती. समन्वय समिती स्थापन करून १० गट तयार करण्यात आले हाेते. तालुक्यातील ९६ गावात तसेच वाड्या-वस्तीवर जाऊन बैठका घेऊन महामोर्चाची जनजागृती करण्यात आली होती. महामोर्चाला तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने लेखी पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. महिलांच्या वतीने बैठक घेऊन माहेरवासिनी महामोर्चाला येण्यासाठी तयारी केली होती. शहरात महामोर्चासाठी येणाऱ्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. महामोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. “एक मराठा लाख मराठा,’ “आरक्षण नाही तर मतदान नाही,’ “आमच्या हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” अशा गगनभेदी घोषणानी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी या माेर्चासाठी २५ हजारांचा जनसमुदाय जमल्याचे सांगितले. दरम्यान, महामोर्चाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून युवक घोड्यावर स्वार झालेला होता. तसेच त्याच्यासोबत शिलेदार घोड्यावर स्वार झाले होते.
पाच मुलींनी महामोर्चामध्ये केले आक्रमक भाषण महामोर्चास शहरापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. नाथ चौक, खासापुरी चौक, बावची चौक मार्गावरुन तब्बल १ किलोमीटरची लांब रांग होती. महामोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुपारी १.३० वाजता कोटला मैदानावर आला. त्यानंतर भव्य स्टेजवर केवळ ५ मुलीनी आक्रमक भाषणे करून सकल मराठा समाजावर आरक्षणाबाबत होत असलेला अन्याय, महिलांवरील अत्याचार आदींवर प्रकाश टाकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.