आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका:30 एप्रिलपूर्वी बाजार‎ समितीच्या निवडणुका‎

उस्मानाबाद‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या‎ निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम‎ झाली होती. त्यात १६६ ग्रामपंचायत‎ सदस्य आणि ९४ विविध विकास‎ सोसायटीच्या सदस्यांचा समावेश‎ नव्हता. उच्च न्यायालयाच्या‎ आदेशानुसार नवीन निवड झालेल्या‎ ग्रामपंचायत, सोसायटी सदस्यांचा‎ समावेश करुन नव्याने मतदार यादी‎ तयार करुन ३० एप्रिलपर्यंत या‎ निवडणुका घेण्याचे आदेश‎ न्यायालयाने दिले आहेत.‎ जिल्ह्यातील आठ बाजार‎ समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी‎ सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार‎ मतदार यादी अंतिम करुन नामनिर्देशन‎ पत्र स्वीकारण्यात येणार होते.

मात्र,‎ तत्पूर्वी उच्च न्यायालयात या‎ प्रकरणाबाबत ज्या सोसायटी व‎ ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने‎ त्यांना मतदान करणे शक्य नव्हते.‎ त्यामुळे या सदस्यांची निवड‎ झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची‎ याचिका न्यायालयात होती. बाजार‎ समितीचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या‎ पुर्वेसंध्येला न्यायालयाने या‎ निवडणुकांना स्थगिती दिली होती.‎

पाच जानेवारी रोजी अंतिम निकाल‎ देत नवीन सोसायटी व ग्रामपंचायत‎ सदस्यांचा मतदार यादीत समावेश‎ करुन ३० एप्रिलपूर्वी निवडणूक‎ घेण्याचे आदेश दिले. सहकार‎ आयोगाकडून नव्याने निवडणुक‎ कार्यक्रम जाहीर करुन ही निवडणूक‎ होणार, असे सहाय्यक निबंधक सुनील‎ शिरापूरकर यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...