आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मुबारक:रमजान ईदनिमित्त अनेक ठिकाणी सामूहिक प्रार्थना; परंडा, कळंब, तेर, पारगाव येथे विविध उपक्रम, गुलाब पुष्पांचे वाटप

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपापसातील नातेसंबंध एकत्र ठेवून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. आई-वडील, भाऊ-बहीण नाते ईदच्यानिमित्ताने जोडून अखंड राष्ट्र निर्माण होण्यास प्रयत्न करावी. मानवजातीच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी ईश्वराकडे प्रार्थना करून देशातील जातीय एकोपा व राष्ट्रीय एकात्मता कायम राहून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मंगळवारी (दि. ३) सकाळी साडेआठ वाजता रमजान ईदनिमित्त गुंजोटी रोड रस्त्यालगत असलेल्या ईदगाह मैदानावर प्रार्थना करण्यात आली.

गुंजोटी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर जमलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. या वेळी बोलताना हाफीज आयुब मुलाणी म्हणाले, ईश्वराच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रत्येकांनी स्वतःला समर्पित करावे. अल्लाहाकडे सर्वांचे दुःख निवारण करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. देशातील मूलभूत प्रश्नांचे निवारण, शोषितांना न्याय देण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. सोशल मीडियावरील पोस्टकडे दुर्लक्ष करत प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आई-वडील, बहीण-भाऊ नातेवाईक यांचे नाते दृढ करत समाजात मैत्री भाव जपावे. गोर गरिब कुटुंबांना सामावून घेण्यासाठी गरिबांना जकात देण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधीक्षक रमेश बरकते, पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

विविध पक्ष, संघटनेकडून शुभेच्छा
ईदची नमाज अदा झाल्यानंतर रस्त्याच्याकडेने विविध पक्ष व संघटनांच्या वतीने उभारलेल्या मंडपात मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड, संदीप चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, संजय पवार, अमोल पाटील, बालाजी पाटील, डॉक्टर सेलचे डॉ. यतिराज बिराजदार, प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, विजय वाघमारे, बाबा मस्के यासह रोटरी क्लब व विविध संघटनाच्या वतीने ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

नळदुर्ग ईदगाह मैदानावर प्रार्थना
नळदुर्ग येथे कोरोनामुळे गेली दोन वर्षे ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आली नव्हती. या वेळी सर्वप्रथम जामे निजामियाचे प्रमुख अल्लामा मौलाना हाफेज सय्यद सगीर अहेमद जागीरदार यांनी धार्मिक प्रवचन केले. त्यानंतर नळदुर्ग शहराचे शहर काजी अहेमद अली मैनोदीन काजी यांनी खुदबा पठण केला. त्यानंतर दुवा (प्रार्थना) झाली. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे, नळदुर्ग पोलिस ठाणे तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगरपालिकेच्या वतीने मुस्लिम बांधवांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी अशोक जगदाळे, तुळजापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरफाळे, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, युवा नेते मल्हार पाटील, नगरसेवक महालिंग स्वामी, अमृत पुदाले, दीपक काशीद, रमेश जाधव, नवल जाधव, किशोर बनसोडे, अमित शेंडगे, प्रवीण चव्हाण, सुजित बिराजदार, सिराज काजी, सिकंदर काजी, पद्माकर घोडके, आनंद लाटे, गौस शेख अबुल हसन रिजवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ईदगाह मैदानावर सामाजिक कार्यकर्ते मन्सूर शेख यांच्या वतीने थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी ईदगाह मैदानावर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाजी गायकवाड, विशाल सगर, ‘जीवीशा’चे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

कळंब येथे ऐक्याचा संदेश
कळंब शहरात ईदगाह मैदान येथे ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण होते. दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या वतीने ईदगाह मैदान येथे मंडपाची सोय व मैदानाची साफ सफाई करण्यात आली होती. भाजपच्या वतीने गुलाबाची फुले देण्यात आली.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, शहराध्यक्ष संदीप बाविकर, डिकसळ े सरपंच अमजद मुल्ला, शिवाजी गीड्डे, माणिक बोंदर अनंत बोराडे, युवराज पिंगळे,अभय गायकवाड, सलीम बागवान, इम्रान काजी, सिध्दार्थ सोनवणे, मौलाना आझर, शौकत शेख आदी उपस्थित होते.

रमजान ईदचे नमाज पठण झाल्यावर मुस्लिम बांधवांना शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देऊन ऐक्याचा संदेश दिला. या वेळी माजी नगरसेवक अनंत वाघमारे, सतीश टोणगे, अतुल कवडे,रोहन पारख, शाम खबाले, नामदेव पौळ, सुरेश शिंदे, गजानन चोंदे, युवासेनाचे गोविंद चौधरी, अजित गुरव, प्रा. दिलीप पाटील, राजाभाऊ गरड, दादा खंडागळे,अनिल पवार,संतोष लांडगे आदी उपस्थित होते.

परंड्यात ईद
परंडा शहरातील दर्गाह परिसरातील ईदगाह मैदानावर शहरेकाझी जफरअली काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार (दि.३) सकाळी ९.३० वाजता नमाज अदा करण्यात आली.

ईदगाह मैदानावर नमाजानंतर पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे,महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदीसह हिंदु बांधवानी रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तेर ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ
तेर ग्रामपंचायतीच्या वतीने ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देेेण्यात आल्या. या वेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी उपसरपंच रविराज चौगुले, सदस्य मंगेश पांगरकर, केशव वाघमारे बापू नाईकवाडी, पांडू भक्ते आदींनी नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

तेर जामा मशिदीत इफ्तार
तेर (ता.उस्मानाबाद) येथे जामा मशीदमध्ये मुस्लिम बांधवांबरोबर रोजा इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर सहभागी झाले. यावेळी प्रशांत फंड, श्याम घोगरे, आदित्य गोरे, अमोल भातभागे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
जिल्हयामध्ये मंगळवारी ठिकठिकाणी रमजान उत्साहाने साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षात कोरोनाचे सावट सर्वच उत्सवांर होते. आता हे मळभ काही काळ का होईना दूर झाले आहे. त्यामुळे जिल्हयाच्या विविध भागातून लोक प्रार्थनेसाठी आलेले होते.

बातम्या आणखी आहेत...