आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण:मस्सा (खं) शिवारात बिबट्यासदृश्य प्राणी

मस्सा (खं)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील मस्सा (खं) शिवारात बिबट्यासदृश्य प्राणी असल्याच्या संशयामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मस्सा ते मांडवा मध्यमार्ग रस्त्याच्या जवळील एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्या दिसल्याची माहिती शिवारातील शेतकऱ्यांनी दिल्यावर नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधला.

वनविभागाने पोलिस प्रशासनासोबत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही ठिकाणी प्राण्याच्या पावलाचे ठसे सापडले असून त्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. हे ठसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे अहवालातून स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...